
या प्रकरणात भक्तियुक्त कर्मयाेग साधकांच्या जीवनातील चढउतार, सुखदुःख,यश-अपयश यांचे विवेचन केले आहे व अशा सर्व साधकांना ईश्वर त्यांच्या किंवा तिच्या इष्ट (आराध्य, उपास्य) देवतेच्या स्वरूपात सांसारिक जीवनात सुख,यश, समृद्धी प्राप्त हाेण्यासाठी कशी मदत करतात हे स्पष्ट केले आहे. जगातील
प्रत्येक व्यक्तीला स्वतःचा असा विशिष्ट स्वधर्म (जबाबदारी), त्यानुसार येणारे
कर्तव्य कर्म, स्वतःचा अहंकार, नैसर्गिक असा सेवाभाव, स्वतःची श्रद्धा व
विश्वासानुसार इष्ट (उपास्य, आराध्य) देवता असते. भक्तियुक्त कर्मयाेग साधना
केवळ या ५ गाेष्टींवर अवलंबून आहे. सांसारिक जीवनात प्रत्येक व्यक्तीला या पाचही गाेष्टी आपाेआप मिळत असतात.त्यामुळे या प्रकरणातील विवेचन जगातील विविध क्षेत्रात, विविध स्तरांवर कार्यरत असलेले स्त्री-पुरुष, तरुण, ज्येष्ठ अशा सर्वांनाच सारखेच उपयाेगाचे आहे. राजयाेग साधना उद्याेजक, शेतकरी बंधू, व्यापारी, सामाजिक व राजनीती क्षेत्रात कार्यरत व्यक्ती, कामगार बंधू, नाेकरवर्ग तसेच सर्व जाती जमातीतील सर्व वयाेगटातील स्त्री-पुरुष व आध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्ती अशा सर्व लाेकांसाठी सारखीच प्रभावशाली व यश देणारी आहे.या पुस्तकात अर्जुन, पांडव व त्यांची राणी, छत्रपती श्री शिवाजी महाराज व भारताचे पंतप्रधान, माननीय श्री. माेदी साहेब यांची भक्तियुक्त कर्मयाेग
प्रकरणातील विवेचन दिशादर्शक राहील.
प्रश्न : भक्तियुक्त कर्मयाेगी कसे काम करतात? त्यांंची काम करण्याची पद्धत
कशी असते?
बाेध :१.भक्तियुक्त कर्मयाेगी साधकाने त्याचे मन, बुद्धी व चित्त ईश्वराशी लिंक केलेली असतात. मानवी जीवनात शरीर व इंद्रिये नेहमी मन व बुद्धीच्या साहाय्यानेच कर्म करत असतात; त्यामुळे अशा याेगी व्यक्तीला ईश्वराचे मन व ईश्वराच्या बुद्धीचे पाठबळ मिळत राहते.
त्यामुळे अशा व्यक्तीस जीवनात वेळ व काळानुरूप एक विशिष्ट उद्देश प्राप्त हाेत राहताे व भक्तियुक्त कर्मयाेगी त्या आधारावरच दैनंदिन जीवनातील कर्मे करण्याला प्राधान्य देताे.
बाेध : २. या भाैतिक जगात कर्म करण्यासाठी हीच पद्धत ईश्वराने मानवासाठी निश्चित केलेली असल्या कारणाने अशा व्यक्तीस ईश्वराचा त्याच्या इष्ट, उपास्य किंवा आराध्य देवतेच्या स्वरूपात आवश्यकतेनुसार वेळ व काळानुरूप नैसर्गिकरीत्या ज्याप्रमाणे आई-वडिलांचे आपल्या अपत्याला न मागता साहाय्य मिळत राहते, तसेच भक्तियुक्त कर्मयाेग (राजयाेग) साधकाला त्याच्या/ तिच्या इष्ट , आराध्य, उपास्य देवतेकडून साहाय्य पण मिळत राहते. त्यामुळे अशा याेगी व्यक्तीच्या जीवनातून स्वतःसाठी काही वेगळे असे
मिळविण्याची लालसा निघून जाते.भक्तियुक्त कर्मयाेग साधकास याचा उपयाेग असा असताे की, या आव्हानात्मक सांसारिक आयुष्यात कर्तव्यकर्मे करण्यासाठी आवश्यक असलेल्या आत्मविश्वासाची त्यांना कमी पडत नाही
बाेध : ३. भक्तियुक्त कर्मयाेगी साधकांस ईश्वरविषयक विधायक उकल (प्राेग्रेसिव्ह अनाेल्डिंग) करून देणारे तत्त्वज्ञान चांगलेच माहीत असते. त्यामुळे
भक्तियुक्त कर्मयाेगी भविष्यात घडणाèया गाेष्टींबद्दल आवश्यक तेवढेच बाेलतात. एकही जास्त वाक्य बाेलत नाहीत. त्यांचे मन हे ईश्वराशी लिंक
असल्यामुळे त्यांंना हे शक्यही हाेते. माननीय श्री. माेदीजींच्या हस्ते अयाेध्येत प्रभू श्रीरामललाची स्थापना
हाेईपर्यंत त्यांंनी या गाेष्टीचे पालन केलेले दिसते. त्यांच्या जीवनाचा हा स्थायीभाव राहिलेला आहे. अर्जुन, पांडव व त्यांची राणी यांचा पण राजसूय
यज्ञात भगवान श्रीकृष्णांची अग्रपूजा करेपर्यंत हाच स्थायीभाव राहिला हाेता.
बाेध : ४. भक्तियुक्त कर्मयाेगी हे जाणताे की, त्याच्याकडे येणारी सत्ता, अधिकार, पैसा, संपती व ज्ञान हे ईश्वराच्या याेजनेचाच एक भाग आहे व त्यामुळे
अशा सर्व गाेष्टी असा याेगी ईश्वराच्याच मार्गदर्शनाखाली सेवाभावनेतून वापरत असताे. त्याच्या स्वतःच्या व्यक्तिमत्त्वात या बाबतीत भ्रष्टता नसते व त्याच्या
अधिकार क्षेत्रात येणाèया भ्रष्ट व्यक्तींना शिक्षा देण्यास त्याला संकाेच पण नसताे
व आनंद पण नसताे. कारण ईश्वराच्या प्रती ते त्याचे कर्तव्यच असते.
बाेध : ५. भक्तियुक्त कर्मयाेग साधकांना या जगातून किंवा इतरांकडून स्वतःसाठी वेगळे असे काहीच मिळवावयाचे नसते, त्यामुळे त्यांना कधीच
अधिक बाेलण्याची गरज नसते.
प्रश्न :भक्तियुक्त कर्मयाेग्याकडून चुका हाेत नाहीत का?
बाेध : या भाैतिक जगाची रचनाच अशी आहे की, काेणत्याही व्यक्तीस
स्त्री असाे किंवा पुरुष असाे, केवळ आत्म्याच्या शक्तीने अहंकाराच्या शक्तीवर
नियंत्रण ठेवणे शक्य नसते.सांसारिक जीवनात मी म्हणजे याेगी (मी म्हणजे आत्मा) या भावनेत कर्म
केल्यास चुका घडत नाहीत व यश मिळत राहते. परंतु विराेधाभास (पॅराडाॅक्स) असा असताे की, मिळालेल्या यशातून निर्माण झालेल्या कर्तृत्वाचे स्वरूप भाैतिक अर्थात दृश्यरूप असल्यामुळे असे यश, कर्तृत्व, ‘मी अहंकार (इगाे)’ शी एकरूप
हाेते, त्यातून माझे कर्तृत्व, माझे यश व माझे ज्ञान असा भावव्यापार सुरू हाेताे. या
सर्व भावनांमधून व्यक्ती मी म्हणजे माझा अहंकार या भावनेच्या अंतर्गत कर्म करू लागते. इथेच व्यक्तीकडून गफलत हाेते. या अहंकाराच्या भावनेत व्यक्ती मी
म्हणजे माझे कर्तृत्व, मी म्हणजे माझे यश अशा मानसिक अवस्थेत कर्म करू लागते. सत्य असे आहे की, अहंकाराची शक्ती ही मुळातच विपरीत स्वभावाची
असल्यामुळे बेभरवशाची असते व त्यामुळेच चूक घडते. कर्म करताना ज्या
प्रमाणात मी म्हणजे माझे कर्तृत्व ही मानसिकता प्रबळ असते त्या प्रमाणात चुका किंवा घाेडचूक सुद्धा घडते. अहंकार हा या सांसारिक जीवनाचा एक मूलभूत भाग असल्यामुळे
भक्तियुक्त कर्मयाेग्यांकडून व भक्तियुक्त कर्मयाेग साधकांकडून सुद्धा अशा गाेष्टी हाेतात व चुका हाेतात.