भगवद्‌गीतेतील राजयोग साधनेचे सांसारिक ज्ञान व गुरुकिल्ली

राजयोग (भक्तियुक्त कर्मयोग) हे पुस्तक सांसारिक लोकांसाठी आवश्यक अशा श्रीमद्‌भगवद्‌गीतेतील व्यावहारिक ज्ञानावर आधारित आहे. मुख्य म्हणजे सांसारिक लोकांसाठी सनातन धर्माची मूळ शिकवण वाल्मीकी रामायणातील अंतर्निहित शिकवण व श्रीमद्‌भगवद्‌गीतेतील व्यावहारिक ज्ञान या सर्वांमध्ये मुळीच भेद नाही.

या कलियुगात भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेली श्रीमद्भगवद्गीता जास्त प्रचलित आहे; कारण की, या गीताेपदेशात ईश्वराने अर्जुनाला व त्याच्या निमित्ताने मुख्यतः सांसारिक लाेकांना त्यांच्या वैयक्तिक, काैटुंबिक, व्यावसायिक,सामाजिक व राजनीतिक जीवनात सुख, यश, समृद्धी कशी मिळवावी व सर्वांगीण विकास कसा करून घ्यावा यासाठीची गुरुकिल्ली उघड केलेली आहे. ईश्वराने कलियुगातील मानवासाठी केलेल्या याेजनेचाच ताे भाग आहे. या राजयाेग साधेनेमुळे आध्यात्मिक ायदे आपाेआप बाेनस म्हणून प्राप्त हाेतात. त्यामुळे श्रीमद्भगवद्गीतेतील व्यावहारिक ज्ञान लाेकांपर्यंत पाेहाेचविण्याचाया पुस्तकाद्वारे लेखकाचा संकल्प आहे. राजयाेग पुस्तकाची मांडणी सांसारिक जीवन जगणाèयांसाठी श्रीमद्भगवद्गीतेतील अंतर्निहित ज्ञान काय दर्शविते या दृष्टीने केलेली आहे. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनास मुख्यतः त्याच्या स्वधर्मानुसार वाट्यास आलेले त्याचे कर्तव्यकर्म त्याच्या इष्ट देवतेसाठी सेवाभावनेने करण्यास सांगितले आहे. ही या पुस्तकातील ज्ञानाची मुख्य भूमिका आहे. सांसारिक जीवनात सुख, यश, सर्वांगीण विकास व समृद्धी मिळविणे हाच आमचा मुख्य उद्देश असताे. ताे साध्य करण्यासाठी आपल्या आवाक्यात असलेल्या काेणत्याही भाैतिक गाेष्टींचा, विषयांचा त्याग न करता उलटपक्षी तशा सर्व गाेष्टींचा, विषयांचा दैनंदिन जीवनात ायदेशीर उपयाेग कसा करता येताे,कसा करावा हेच भगवद्गीतेचे गुह्य ज्ञान आहे. यासाठी श्रीमद्भगवद्गीतेतील राजयाेग सूत्र कसे हमखास काम करते हे या पुस्तकात स्पष्ट केलेले आहे.या पुस्तकात श्रीमद्भगवद्गीतेतील राजयाेग साधनेचे मुख्य सूत्र खालील प्रमाणे स्पष्ट केलेले आहे. ‘‘आपल्या स्वधर्माप्रमाणे आपली कर्तव्यकर्मे आपल्या इष्ट (उपास्य, आराध्य) देवतेची सेवा म्हणून करणे’’ या राजयाेग सूत्राचे वैशिष्ट असे आहे की, हे सूत्र दैनंदिन जीवनासाठी स्टँडर्ड ऑपरेटिंगचे प्राेसिजर (डजझ) म्हणून वापर केल्यास सांसारिक जीवनात सुखाची अनुभूती येऊ लागते.राजयाेगभक्तियुक्त कर्मयाेग साधना प्रत्येक व्यक्तीच्या अंतःकरणात ईश्वराने इनबिल्ट करून ठेवलेली आहे

ईश्वराने ही साधना अंगीकारण्यासाठी व्यक्तीला जगातील काेणत्याही बाह्य ज्ञानावर व साधनांवर अवलंबून राहण्याची आवश्यकताच ठेवलेली नाही.राजयाेग साधकाला त्या गाेष्टी वेळ व काळानुसार उपलब्ध हाेत राहण्याची जबाबदारी त्याची इष्ट (उपास्य, आराध्य) देवता स्वतःकडे घेते. या पुस्तकात राजयाेगाची साधना करण्याच्या दृष्टीने आपले कर्तव्यकर्म, आपला स्वधर्म, आपली इष्ट देवता यांचे स्वरूप स्पष्ट केले आहे. तसेच अहंकार म्हणजे काय याचे वैज्ञानिक स्पष्टीकरण व उदाहरणासहित अहंकाराची व्याख्या केलेली आहे. तसेच आपल्या स्वतःच्या अहंकाराच्या शक्तीचा व आपल्यात असलेल्या सेवाभावनेचा आपल्या सर्वांगीण प्रगतीसाठी सृजनशील उपयाेग कसा करावा हे दर्शविले आहे. जीवनातील वरील पाचही अतिमहत्त्वाच्या गाेष्टींकडे आपला दृष्टिकाेन निष्काळजी असताे; म्हणूनच सांसारिक जीवनात सुख-दुःख, यश-अपयश अशी मिश्र फळे मिळतात. राजयाेग (भक्तियुक्त कर्मयाेग) सूत्र फक्त या पाचही गाेष्टींत समन्वय साधते. त्यामुळे सासांरिक जीवनात सुख व यश मिळण्याचा मार्ग माेकळा हाेताे.
काेणत्याही वयातल्या शिकलेल्या किंवा न शिकलेल्या, विद्यार्थी, तरुण, गृहस्थ, स्त्री-पुरुष, व्यावसायिक, राजनीतिक क्षेत्रात काम करणाèया अशा सर्व लाेकांसाठी जीवनात सुख, यश व समृद्धी प्राप्त करून घेण्यास सनातन धर्माचे वर दर्शविलेले सूत्र दैनंदिन जीवनात अंगीकारणे पुरेसे असते. सांसारिक जीवनात कर्म व भक्ती यांची सांगड घालणे म्हणजेच साधना. जाे काेणीही भक्तियुक्त कर्मयाेग साधनेप्रमाणे भक्तियुक्त कर्मयाेग’ दैनंदिन जीवनात आचरण करेल, अशा साधकाचा सांसारिक जीवनात सर्वांगीण विकास हाेताे. म्हणूनच भक्तियुक्त कर्मयाेग याला ‘राजयाेग’ असे म्हणतात